Homeमित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा Mitra Joda Ani Lokanvar Prabhav Pada
मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा Mitra Joda Ani Lokanvar Prabhav Pada
मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा Mitra Joda Ani Lokanvar Prabhav Pada

मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा Mitra Joda Ani Lokanvar Prabhav Pada

 
₹49
Product Description

डेल कार्नेगी यांनी लिहलेले - मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे पुस्तक एक कृतीशील असे पुस्तक असुन आपला भविष्यकाळ अधिक आणि अधिक आनंददायी व यशस्वी व्हायला हवा असे आपना सर्वानांच वाटते अश्या प्रत्येकांनी किमान एक वेळ तरी हे पुस्तक वाचायला हवे किती तरी वेळा आपन सर्वत्र अनुभव घेत असतो रोजचे आयुष्य जगतेवेळी विनाकारण किती वाद होत असतात हे आपन पाहतो. आपला मराठी माणूस तर मोडेल पन वाकणार नाही हीच वृत्ती ठेऊन वागत असतो (मोडल्यानंतर कोणतीही गोष्ट पहिल्या सारखी होईल का ? ) शकतो एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा यात सुर्वणमध्ये नेहमीच वर्तमान व भविष्यासाठी फलदायी असतो. आयुष्यातील किती तरी वादविवाद निव्वळ शब्दाने शब्द वाढल्याने होत असतात या कार्नेगी सरांनी या मध्ये अंत्यत सोप्या शब्दात हजारो उदाहरणे देऊन वाद विवाद कसे टाळता येतात हे यात सांगितले आहे ते असे सांगतात कि व्यक्ती कितीही छोटा असु द्या आत्मसन्मान त्यांच्यात असतोच लोकांना स्वतः विषयी बोलणे आवडते या बाबत कार्नेगी सर म्हणतात की लोक तुमच्यात रूची घेत नाहीत ना ते माझ्यात घेतात ते अगदी तिन्ही त्रिकाळ फक्त स्वतः मध्ये रूची घेतात अगदी सकाळी दुपारी रात्री जेवणानंतर सुध्दा एखाद्या माणसाला दुखःवल्याने त्यांच्या मनात रागाची भावना ईतकी तीव्र असते की मृत्यू नंतरही शोकाच्या ऐवजी त्याने केलेला अपमानच आठवतो यातुन प्रत्येकाने बोध घेतला पाहिजे की आपन कधी कधी आपल्या जीभेवरचा ताबा सुटल्याने व क्षणिक रागामुळे एखाद्याचे मन कायमचे दुरावेल अशी कृती कटाक्षाने टाळायला हवी वादविवाद जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वादविवाद टाळा नेहमीच इतरांच्या मनाचा आदर करा तुम्ही चुकला असे म्हणने शक्यतो टाळा पुढच्या व्यक्तीचे नेहमी शांतपणे ऐकून घ्यायला हवे चांगल्या वक्ता होण्याचा आपन प्रयत्न करतो पन कधी आपणास चांगला श्रोता व्हायला पाहिजे हे कोणीही आपणास सांगत नाही ते यातुन समजते कितीही नाजुक प्रसंगात मनावर ताबा असायला हवा आरडाओरडा केल्याने समस्या कधीच सुटणार नाही मात्र परिस्थिती आणखीण बिकट होईल असे कार्नेगी म्हणतात आपली चुक आपन मान्य केली तर तुम्ही कधीच अडचणीत येऊ शकत नाही त्यामुळे सगळे वादविवाद मिटतात आणि तुमच्या विरोधकालासुध्दा न्याय बुध्दीने वागण्याची स्फुर्ती मिळते हे लक्षात असू द्यावे या बाबत त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. समोरच्याशी बोलताना आधी त्याचे कौतुक करा ज्याला नेतृत्व करायचे आहे त्याने ही हातोटी वापरायला हवी एखाद्या कठीण प्रसंगात व्यक्ती ने कसे तोंड द्यायला हवे या बद्दल ते सांगतात की थिओडोर रूझवेल्ट यांच्या कारकिर्दीत एखाद्या बाबतीत कठीण प्रसंगात निर्णय घ्यायचा प्रसंग आला तर ते White House मधील लिंक न यांच्या तैलचित्रा कडे पाहुन स्वतःला असे विचारत असे जर माझ्या जागी लिंकन असते तर त्यांनी ही समस्या कशी सोडवली असती. आपन कसे असायला हवे व आपण काय आहोत अशी स्वतःशीच तुलना केली तर आपण अर्धजागृत आहोत अशी आपली खात्री पटते. आपण आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा फारच थोडा वापर करतो. अधिक सुस्पष्टपणे सांगायचे झाले,तर प्रत्येक माणुस स्वतःभोवती कुंपण घालून जगतो. त्याच्याकडे इतक्या अनेक प्रकारच्या अर्मयाद क्षमता असतात,पण त्याच्या सवयीमुळे त्यांचा वापर करण्यात तो अपयशी ठरतो.`हे पुस्तक वाचून आपन कसे वागायला हवे हे जरी नाही शिकलो तरी कसे वागू नये हे मात्र नक्की शिकतो!

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now